कायद्याच्या दिशेनं एक पाऊल पुढं”
“पत्रकारांवर होणार्या हल्ल्यांबाबत आपणही चिंतीत असून राज्यात पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्याबाबत शासनाने विचार करावा .या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहोत” असें आश्वासन राज्यपाल के.विद्यासागर राव यांनी काल आम्हाला दिलं आहे.राज्यपालांच्या या आश्वासनाचे वर्णन” कायद्याच्या दिशेनं एक पाऊल पुढं” असं करता येईल.राज्यपालांनी सरकारला पत्र लिहिलं म्हणजेच कायदा होईलच असं नाही असा सूर काही मित्र लावू शकतात.ते खरंही आहे,पंरतू राज्यपालांना आपली भूमिका मान्य आहे आणि त्यासाठी ते प्रयत्नही करणार आहेत ही गोष्ट फार महत्वाची आहे.यापुर्वीच्या दोन राज्यपालांची आम्ही भेट घेतली होती.मात्र त्यांनी बघतो,पाहतो याशिवाय कोणतीही स्पष्टभूमिका घेतली नव्हती.या पार्श्वभूमीवर राज्यपाल विद्यासागर राव यांनी घेतलेली स्पष्ट भूमिका ही आपल्या चळवळीसाठी लाख मोलाची,आणि बळ देणारी आहे असं आम्हाला वाटतं.राज्यपाल आमच्याबरोबर आहेत ही घटना सरकारवर नैतिक दबाव आणनारी आहे .राज्यपाल महोदयांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.शिष्टमंडळात सहभागी झालेल्या सर्व मित्रांचेही आभार
उत्तर प्रदेशमधील पत्रकार जगेंद्रसिंग आणि मध्यप्रदेशातील पत्रकार संदीप कोठारी यांच्या झालेल्या हत्त्या आणि महाराष्ट्रात पत्रकारांवर होत असलेले हल्ले यांचा निषेध कऱण्यासाठी काल दुपारी 12 वाजता आझाद मैदानावर निदर्शन कऱण्याचं नक्की झालं होतं.निखिल वागळे,राजीव खांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर संपादक आणि पत्रकार आंदोलनात सहभागी होणार होते मात्र काल मुबईत एवढा पाऊस कोसळत होता की, आंदोलनाचा कार्यक्रम रद्द करावा लागला.आता 13 जुलै रोजी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंबईसह राज्यभर आंदोलन करायची कल्पना आहे.आंदोलनाचे स्वरूप आणि अन्य तपशीलाबाबतचा अंतिम निर्णय 30 जून रोजी मुंबईत होणार्या हल्ला विरोधी कृती समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे.13 तारखेचं हे आंदोलन सरकारला धक्का देणारं ठरलं पाहिजे आणि संघटनाभेद न पाळता सर्व पत्रकारांनी त्यात सहभागी झालं पाहिजे.एक दणका दिला तर आता कायदा झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.तेव्हा आपल्या सर्वा कडून मी सह कार्या ची अपे क्षा करतो ( SM )