कानपूरमध्ये दोन पत्रकारांना बेदम मारहाण केली गेलीय.कारण तेच बातमी.कानपूरच्या पीएसआयईटी इंजिनिअरिंग ने फीसमध्ये अचानक वाढ केल्याने संतप्प झालेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेजात निदर्शने केली.टीव्ही रिपोर्टर सुनील गुप्ता आणि कॅमेरामन विष्णू तेथे पोहचले.शुटिंग केली.नंतर व्यवस्थापनाचा बाईट घेण्यासाठी चेअरमनकडे गेले.चेअरमन मिटिंगमध्ये असल्याचे सांगितल्यानंतर पत्रकार निघाले.पण कॉलेजच्या कॅम्पसमध्येच त्यांची गाडी अडवून पंधरा गुंडांनी त्यांच्यावर हला केला.शूट केलेली फिल्म परत करा असे हे गुंड म्हणत होते.गुडानी कॅमेऱ्याचीही मोडतोड केली आहे.कशी तरी जीव वाचवून पत्रकार बाहेर पडले.तेथून त्यांनी अन्य पत्रकारांना फोन लावले.शहरातील सारे पत्रकार एकत्र आल्यानंतर पत्रकारांनी पोलिसात जाऊन कॉलेज व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आङे.