काँग्रेसविरोधी मीडियातील प्रवृत्तींना ठेचून काढू -शिंदे

1
1047

24 फेब्रुवारी : या ना त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी अडचणीत सापडणारे केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभेचे उपनेते सुशीलकुमार शिंदे यांनी आता पुन्हा एकदा एक वाद ओढावून घेतला आहे. यावेळी सुशीलकुमार शिंदे मीडियावर घसरले आहे.

इलेक्ट्रॉनिक मीडियामधील काही लोक बसल्या बसल्या थुकपट्टी लावण्याचं काम करत आहे. मध्यंतरीच्या काळाच मीडियातील काही मंडळींनी काँग्रेसविरोधात अप्रचाराची मोहिम उघडली होती अशा प्रवृत्तींना ठेचून काढलं जाईल, अशी धमकीच शिंदे यांनी दिली.

शिंदे एवढ्यावर थांबले नाही पुढे ते म्हणाले, मीडियांनी समाजासाठी चांगली कामं करावी त्याबद्दल तुम्हाला कुणी रोखलं नाही. अशा कामाचं कौतुक केलं जाईल. पण मतांच्या करता एखाद्याला बदनाम करण्याचं काम, एखादी घटना चुकीचं सांगणं आणि समाजामध्ये वातावरण बिघडवणे हे देशाची जनता कधीच खपवून घेणार नाही असंही शिंदे म्हणाले. यावेळी शिंदेंनी मीडियावरच जातीय दंगली भडकावण्याचा गंभीर आरोपही केला. ते सोलापूरमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.शिंदे यांच्या वक्तव्याचा पत्रकार हल्ला कृती समितीने निषेध केलाय. सुशीलकुमार शिंदे यांनी मीडियाची माफी मागावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांनी केलीय. विशेष म्हणजे शिंदे मीडियाबद्दलच नाही तर या अगोदरही आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले होते. बोफोर्स घोटाळा जसे लोक विसरले तसा कोळसा घोटाळाही विसरतील असं विधानही शिंदे यांनीच केलं होतं. हेच नाही तर अलीकडेच आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना वेडा मुख्यमंत्री अशी टीकाही शिंदे यांनीच केली होती.

(Visited 82 time, 1 visit today)

1 COMMENT

  1. If you promote a sycophant man of low calibre to Home Ministership, he is going to act like that only. I sincerely wish journalist from his contituency should ensure that he looses his deposit in forthcoming elections.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here