रायगड जिल्हयातील कर्नाळा तसेच माथेरानचा विकासासाठी शासन अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती अर्थ ,नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
पनवेलमधील चार रस्त्यांचे सिमेंट काँक्रेटीकरण करण्यात येणार आहे.43 कोटी रूपयांच्या या कामांचा शुभारंभ मुनगंटीवार यांच्या हस्ते काल झाला त्यावेळी ते बोलत होते.आगामी काळात पायाभूत सुविधांसाठी पनवेल शहराला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.पनवेल ते माथेरान हा रोपवे आणि पनवेलवरून भिमाशंकरला जाण्यासाठी रस्तायाचे काम मार्गी लावण्याचे अभिवचनही अर्थमंत्र्यांनी दिले.यावेळी स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते–
(Visited 87 time, 1 visit today)