कर्जत येथील पत्रकार आशिष बोरा यांना काल सायंकाळी दोन युवकांनी बस स्थानकावर बेदम मारहाण केली त्यात बोरा यांचे डोके फुटले आहे.बोरा हे पुण्यनगरी तसेच एका वृत्तवाहिनीचे काम करतात.बोरा यांचा कुरिअरचा देखील व्यवसाय आहे.तुमच्याकडं कुरिअर द्यायचं आहे असं सांगून त्यांना बस स्थानकावर बोलावण्यात आलं.तेथे त्यांना बेदम मारहाण केली.त्यांचे डोके फुटले असून त्यांच्या तोंडाला,छातीला मार लागला आहे.त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.
बोरा यांनी या संबंधी पोलिसात तक्रार दिली असून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एका महिलेची मागच्या आठवड्यात कोणी तरी छेड काढली होती.ती छड काढणारी व्यक्ती बोरा होती या समजुतीने हा हलला झाला आहे.जेव्हा त्या महिलेस बोलावले गेले तेव्हा ती व्यक्ती बोरा नव्हती असं त्या महिलेनं सांगितलं.या प्रकरणानं बोरानां प्रचंड धक्का बसला आङे.