कर्जत – दि. ( संजय गायकवाड )
कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने व डॉ. सगुण नगरे आणि शिला (माई) नगरे यांच्या सहकार्याने आज रविवार दि. १५ जुन २०१४ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
येथील श्री कपालेश्वर मंदिरामध्ये सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यत कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने रक्तादान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कर्जततालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षा वैदेही पुरोहित यांच्या हस्ते बाळशात्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन रक्तादान शिबीराचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी सार्वजनिक रक्तादाता राजाभाऊ कोठारी, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पुरोहित, विजय मांडे, सुनिल दांडेकर, माजी नगरसेवक नितीन परमार, प्रभाकर करंजकर,वसंत सुर्वे आदी उपस्थित होते.
अध्यक्षा वैदेही पुरोहित यांनी सर्वाचे स्वागत केले. पत्रकार विजय मांडे यांनी सर्वप्रथम रक्तादान करुन रक्तदानाचा सुभारंभ केला. याप्रसंगी ४५ रक्तदात्यांनी रक्तादान केले. रक्त संकलनाचे काम इंडियन रेड क्रॉस सोसायटी मुंबई डॉ. अजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास उन्हाळेकर, मनिषा वेलये, इच्छा चव्हाण, विद्या बांदिवडेकर यांनी केले.कार्याध्यक्ष संजय गायकवाड यांनी सर्वाचे आभार मानले.
याप्रसंगी मोहनशेठ ओसवाल, मधुकर कुलकर्णी, प्रविण गांगल, रंजन दातार, दिनेश सोलंकी, महेंद्र निगुडकर,सुनिल गोगटे, तानाजी बैलमारे,समिर सोहनी, योगेश पोथरकर,दिनानाथ देशमुख, हरिश्चंद्र मांडे, गणेश शेलार, राहुल कुलकर्णी, महेंद्र कांबळे, राजीव देशपांडे,नितीन पिंपरे आदी उपस्थित होते.