एम.जे.अकबर यांनी लैगिक छळ केल्याचे आरोप यापुर्वी 23 महिला पत्रकारांनी केलेत.आता थेट एम.जे.अकबर यांनी आपल्यावर बलात्कार केला होता असा आरोप पल्लवी गोगोई या महिला पत्रकारानं केला आहे.पल्लवी सध्या नॅशनल पब्लिक रेडिओमध्ये मुख्य अर्थ संपादक म्हणून कार्यरत आहेत.बलात्कार करण्यापुर्वी अकबर यांनी आपलं लैगिक शोषनही केलं असं गोगोई यांचं म्हणणं आहे.पल्लवी यांनी वॉश्गिटन पोस्टला सविस्तर मुलाखत दिलीय.घटना 23 वर्षांपूर्वीची आहे.त्या एशियन एजमध्ये असतानाची.पल्लवी यांनी वृत्तपत्राचं एक पान तयार केलं होतं.संपादक असलेल्या अकबर यांना ते दाखविण्यासाठी त्या त्यांच्या केबिनमध्ये गेल्या.तेव्हा अकबर यांनी त्यांची तारीफ केली आणि चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.नंतर मुंबईतील एका हॉटेलात पुन्हा असाच प्रयत्न केला गेला.पण पल्लवी यांनी पळ काढला.नंतर त्याना नोकरीवरून काढण्याचीही त्यांनी धमकी दिली.असं गोगोई यानी वॉश्गिटन पोस्टला सांगितलं.
नंतर कामासाठी गोगोई यांना जयपूरला पाठविलं गेलं.तीथं अकबर यांनी गोगोई यांना आपल्या हॉटेलमध्ये बोलावलं.रूममध्ये जाताच अकबर यांनी पल्लवी यांचे कपडे फाडले आणि त्याच्यावर बलात्कार केला.मी प्रतिकार करण्याचा बराच प्रयत्न केला पण तो फोल ठरला.असं गोगोई यांनी म्हटलंय.या घटनेनंतर गोगोई यांनी नोकरी सोडली.अन्य महिलांमुळं मला बळ मिळालं म्हणून मी ही घटना सर्वांशी शेअर करू शकले असं पल्लवी गोगोई यांनी म्हटलं..
स्वखुषीनं संबंध ठेवलेः अकबर
पल्लवी गोगोई यांनी आपल्याबरोबर स्वखुषीनं शरीर संबंध ठेवले असं स्पष्टीकरण एमजे अकबर यांनी दिलंय.बलात्काराचा आरोप खोटा असल्याचा दावाही त्यांनी केलाय.अकबर यांच्या पत्नी मल्लीका अकबर यांनी देखील त्यांची पाठराखण केलीय.पल्लवी गोगोई यांच्यामुळं आपल्या संसारता वितुष्ट आलं होतं असं त्यांनी म्हटलंय.गोगोई आणि तुशिता पटेल वरचेवर आमच्या घरी यायच्या दारू प्यायच्या,जेवायच्या तेव्हा त्या दडपणाखाली असल्याचं किंवा घाबरल्याचं दिसत नव्हतं असं मल्लीका अकबर यांनी म्हटलंय.