कराचीः पत्रकारांवर किंवा दैनिक आणि वाहिन्यांच्या कार्यालयावर हल्ले होणं ही आम बात आहे.असे हल्ले जगभर सुरू असतात.आता पत्रकार संघटनांच्या कार्यालयात घुसखोरी करून पत्रकारांची छळवणूक करण्याचे प्रकार सुरू आहेत.कराची प्रेस क्लबच्या कार्यालयात काही बंदुकधारी घुसले आणि काही वेळ त्यांनी तिथं धुडगुस घातला.या हत्यारबंद लोकानी प्रेस क्लबमध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास प्रेवश केला.नंतर पूर्ण कार्यालयाचाच ताबा घेतला.पत्रकारांचा छळ केला.विविध खोल्यांची तपासणी केली..इमारतीच्या वरच्या मजल्यावर तसेच स्पोर्टस हॉलमध्ये जाऊन त्यांनी तपासणी केली.तेथे त्यांनी फोटो घेतले,व्हिडिओ शूटिंग केले.साध्या वेषात आलेले हे जवान होते असं प्रेस क्लबच्या सदस्याचं म्हणणं आहे.यावर विचार करण्यासाठी प्रेस क्लबची बैठक झाली.या घटनेच्या निषेधार्थ पत्रकारांनी प्रेस क्लब ते गव्हर्नर हाऊस दरम्यान निषेध मार्च काढला.
गव्हर्नरनी पत्रकारांचं म्हणणं ऐकून घेत मी मिडियाच्या स्वातंत्र्यासाठी माझे नेहमीच समर्थन राहिल असे त्यांनी सांगितले.