पत्रकार संरक्षण कायद्यासाठी दिलेला लढा राज्यातील पत्रकारांची सत्वपरीक्षा पाहणारा होता.तब्बल 12 वर्षे त्यासाठी राज्यातील पत्रकारांना संघर्ष करावा लागला.हा लढा पत्रकारांच्या जिद्ीचा,एकीचा जसा प्रत्यय आणून देणारा होता तव्दतच तो एखादया महत्वाच्या घटकाच्या प्रश्नाकडं सरकार किती उदासिनपणे पाहू शकते याचंही दर्शन घडविणारा होता.हा लढा लढताना अनेक आशा-निराशेचे अनेक प्रसंग आले.टीकाकारांनी संधी मिळेल तेथे झोडण्याचा प्रयत्न केला मात्र आम्ही त्याची पर्वा केली नाही.निर्धारानं,चिकाटीनं ही लढाई लढली.बारा वर्षाचा हा लढा नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार असल्यानं या लढ्यातील कथा आणि व्यथा लोकांसमोर यायला हव्यात असा आग्रह अनेक मित्रांनी धरला होता.त्यांच्या सूचनेनुसार या लढ्याची हकिकत सांगणारे,लढा पुढे कसा सरकत गेला याची माहिती देणारे आणि कोणी आणि कसे अडथळे आणले याचंही पोस्टमार्टम कऱणारे कथा एका संघर्षाची हे पुस्तक पूर्ण करण्याचा विचार आहे.1 मे रोजी बीडमध्ये विजय मेळावा आहे.त्यावेळी हे पुस्तक व्हावं अशी योजना होती पण विषयाची व्याप्ती आणि माझा सततचा प्रवास यामुळं थोडा वेळ होत आहे.तरीही 13 मे पर्यंत हे पुस्तक तयार होईल असं नियोजन करतोय.आपल्या शुभेच्छा नेहमीप्रमाणे पाठिशी राहतील यात शंका नाही.
तुमचा एस.एम.–