नागपूर:सौजन्याची एैशी की तैशी करत एस टी. महामंडळाच्या एक कंडक्टरने चक्क एका पत्रकाराची कॉलर पकडून त्याला धक्काबुक्की केली. अजय अस्वले असे या पत्रकारांचे नाव आहे..
घटना १५ एप्रिलची. अस्वले सकाळच्या नागपूर – तुमसर बसमध्ये चढले. (एम. एच. 20डी 9319) त्यांनी मौदाचं तिकीट मागितल्यानंतर मौदा येथे बस थांबत नसल्याचे कंडक्टरने सांगितले. त्यावर अस्वले यांनी या बसला मौदाला थांबा असल्याचे सांगितले.. यावरून दोघात वादावादी झाली. त्यामुळे कंडक्टर महाशय खवळले आणि त्यांनी चक्क पत्रकार अस्वले यांची कॉलर पकडली. त्याचे छायाचित्र सव॓त्र व्हायरल झालं आहे. अस्वले यांनी नागपूर डेपो वयवसथापकांकडे तक्रार दाखल केली आहे..