औसा येथील पत्रकारांचा अभिनंदनीय उपक्रम
.
औसा :लातूर जिल्ह्यातील औसा येथील पत्रकारांचं विशेष कौतुक करावं लागेल.. येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रूगणांच्या नातेवाईकांची लॉकडाऊन मुळे भोजन आणि पिण्याच्या पाण्याची प़चंड अडचण होत होती.. ही बाब औसा येथील काही पत्रकारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पुढाकार घेत नातेवाईकांच्या जेवणाची मोफत व्यवस्था केली आहे.. सकाळी अकरा ते बारा आणि संध्याकाळी सात ते आठ या वेळात रूगणांच्या नातेवाईकांसाठी जेवण उपलब्ध करून देण्यात आले आहे.. या उपक्रमाचा प्रारंभ आज औसा तहसिलदार शोभा पुजारी, नगराध्यक्ष अफसर शेख, पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला..
रूगणांच्या नातेवाईकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव सचिन मिटकरी, औसा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय सगरे आणि अन्य पत्रकारांनी केले आहे..
सामाजिक बांधिलकी जपत औसा येथील पत्रकारांनी सुरू केलेला उपक्रम अभिनंदनीय आणि अनुकरणीय असल्याचे मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले असून औसा येथील सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत..