ओरिसातील टीव्हीचे पत्रकार तरूण आचार्य यांच्या हत्त्येची चौकशी करून आरोपींना कडक शिक्षा करावी आणि आचार्य यांच्या नातेवाईकांना 50 लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी पत्रकारांनी आज भुवनेश्वर येथे निदर्शने केली.ओरिसा जर्नालिस्ट असोसिएशनने या हत्याकांडाची सीबीआयतर्फे चौकशी करण्याची मागणी केली आहे.भुवनेश्वर जिल्हा पत्रकार संघानेही घटनेचा निषेध करीत आ़चाय यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यौची मागणी केलीय.गंजाम जिल्हयातील खलीकोट येथे एका वाहिनीसाठी काम करणाऱे आचार्य यांची मागच्या मंगळवारी अत्यंत निर्दयपणे हत्त्या केली गेली आहे.