माजलगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीनं दिला जाणारा दर्पण पुरस्कार यंदा मंत्रालयातील आरोग्य कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना जाहीर झाला आहे.बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि पत्रकार प्रसन्न जोशी यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा 6 जानेवारी रोजी संपन्न होत आहे.ओमप्रकाश शेटे हे माजलगाव तालुक्यातील द्रिंद्रुडचे रहिवाशी.छोट्याश्या गावातून मुंबईत येत त्यांनी मुंबईत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.आरोग्य कक्षाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा घेऊन शेकडो लोक दररोज येत असतात.अशा स्थितीतही आलेल्या रूग्णांच्या नातेवाईकाना मानवतेच्या भावनेतून वागणूक देत त्यांची दुःखं हलकी करणयाचं मोलाचं काम शेटे करीत असतात.,आपल्याकडे आलेल्या अर्जाच्या फाईलींचा लगेच निपटारा करून रूग्णांच्या नातेवाईकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत याची दक्षता शेटे घेत असल्यानेच या कक्षाबद्दलचा विश्वास लोकांच्या मनात दृढ झालेला आहे.सामाजिक जाणिवेतून काम करणारा,सर्व सामांन्यांबद्दल कणव असलेला आणि लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारा अधिकारी अशी ओमप्रकाश शेटे यांची ओळख देता येईल.त्यामुळे दर्पण पुरस्कारासाठी माजलगाव पत्रकार संघाने योग्य व्यक्तीची निवड केलीय असं म्हणावं लागेल.शेटे यांचा 6 जानेवारीली सत्कार होत आहे.आपल्या गावच्या लोकांकडून होत असलेला हा सत्कार अन्य कोणत्याही सत्कारापेत्रा महत्वाचा आणि मोलाचा असतो.ओमप्रकाश शेटे यांचे मनापासून अभिनंदनगेल्या वर्षी मी माजलगावच्या कार्यक्रमास उपस्थित होतो.सारे तरूण पत्रकार अत्यंत दर्जेदार कार्यक्रम घेतात.आता माजलगाव सारख्या छोट्या छोट्या गावात पत्रकार दिनाच्या सोहळे व्हायला लागलेत ही स्वागतार्ह गोष्ट आहे.या निमित्तां माजलगावच्या सर्व तरूण पत्रकारांचेही अभिनंदन आणि शुभेच्छा.