इतरांचे स्टींग करून थकलेले चॅनल्सवाले आता आपसात कपडे फाडायला लागलेत.न्.ूज एक्स्प्रेसने काल चॅनल वन आणि लेमन टीव्हीचे स्टींग करून माद्यमांचा चेहरा जगासमोर आणला.ऑपरेशन मिडिया नामक या ऑपरेशनने चॅनल वन आणि लेमन टीव्हीचे मालक जहीर अहमद हे जाहीरपणे कमाओ,बाटो,एक-एक जगब खूल जाओ असे बोलताना कॅमेऱ्यात दिसले.यात वाहिन्यांचे वर्तमान संपादक अंजनी कुमार यांनाही दाखविले गेले आहे.चॅनल वन आणि लेमन टीव्हीच्या माध्यमातून कशा प्रकारे पेज न्यूजचा धंदा सुरू आहे यावर स्टींगमध्ये भाष्य केले आहे.या स्टींग मुळे दोन्ही वाहिन्यांची हालत बेकार झालीय.न्.ीज एक्स्प्रेसच्या विरोधातही अशीच एखादी स्टोरी लेमन वरून दाखविली जाण्याची शक्यता आहे.
एका वाहिनीने दुसऱ्या वाहिनीचे स्टींग कऱण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी