डॉ.तात्याराव लहाने यांना मराठवाडा भूषण,
नाना पाटेकर यांना मराठवाडा मित्र तर
एस.एम.देशमुख यांना मराठवाडा गौरव पुरस्कार जाहीर.

मुंबई दिनांक 5 (प्रतिनिधी ) ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांना यंदाचा प्रतिष्ठेचा मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठवाडयातील शेतकर्‍यांसाठी ज्यांनी भरीव योगदान दिले असे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना मराठवाडा मित्र तर पत्रकारांसाठी भरीव योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांना मराठवाडा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता रवीद्र नाट्य मंदिर येथे हा कार्यक्रम संपन्न होत आहे.मराठवाडा लोकविकास मंचचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी आज मुंबई येथे या पुरस्कारांची घोषणा केली.
मराठवाडा विकास मंच या संस्थेच्यावतीने मराठवाड्यातील कर्तृत्वान व्यक्तींचा मराठवाडा भूषण आणि मराठवाडा गौरव पुरस्काराने गौरव केला जातो.यंदाच्या पुरस्कारांर्थीमध्ये डॉ.लहाने यांच्या खेरीज उद्योगपती राम भोगले,ज्येष्ठ कलावंत गिरीश कुलकर्णी,महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या डॉ.भारती लव्हेकर ,ज्येष्ठ अधिकारी महेश झगडे यांचाही सन्मान केला जाणार असून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा यावेळी विशेष सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमास विधान सभेचे सभापती हरिभाऊ बागडे,भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे,पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर,कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकर,विरोधी पक्ष नते धनजंय मुंडे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विनायक मेटे असतील.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठवाडा लोकविकास मंचच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here