मुंबईःपत्रकार आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी रस्त्यावर उतरत आहे.राज्यात सर्व जिल्हयात हे आंदोलन होत आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख आणि मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक हे ठाणे येथे होणार्या आंदोलनात सहभागी होत आहेत.
परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा अकोल्यात,कार्याध्यक्ष गजानन नाईक सिंधुदुर्ग,सरचिटणीस अनिल महाजन बीड येथील आंदोलनाचे नेतृत्व करतील तर कोषाध्यक्ष शरद पाबळे पुणे जिल्हयातील आंदोलनाचे नेतृत्व करतील.अन्य जिल्हयात पत्रकार संघ आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पदाधिकारी आंदोलनाचे नेतृत्व करतील.
जास्तीत जास्त पत्रकारांनी 26 तारखेच्या आंदोलनात सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मराठी पत्रकार परिषदेने केले आहे.
पत्रकार मागण्या मान्य करा