पंधरा दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे जगप्रसिध्द एलिफंटा केव्हज परिसरात जमिनीला तडे गेले असून हे तडे 55 मीटरपर्यंत वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.स्थानिकांनी ही माहिती वरिष्ठांना कळविल्यानंतर अगोदर पुरातत्व विभागाने घटनास्थळाची पाहणी केली त्यानंतर काल पुरातत्व विभाग आणि महसुल विभागाच्या अधिकार्यांनी एलिफंटा केव्हज परिसराची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.तडे वाढत असल्याने लेण्यांना कोणताही धोका पोहचू नये यासाठी परिसराचा हायड्रोलिक सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाच्यावतीने देण्यात आली.मुंबईपासून दहा नॉटिकल मैल अंतरावर घारापुरी बेटावर जगप्रसिध्द शैव लेण्या आहेत.सहाव्या शतकात कलचुरी घराण्याच्या कारकीर्दीत या बाधल्या गेल्या असाव्यात असा एक प्रवाह आहे.चालुक्य काळात त्या बांधल्या गेल्या असाव्यात असाही दुसरा मतप्रवाह आहे.लेण्याच्या काळाबद्दल मतभिन्नता असली तरी लेण्याचं अनुपम सौदर्याबद्दल कोणतंही दुमत नाही.त्यामुळे लेण्याची जगात ख्याती आहे.अशा हा जागतिक वारश्याला धोका पोहचू शकत असल्याने चिंता व्यक्त होत आहे–