एबीपी माझा” चा खोडसाळपणा..
नांदेड जिल्ह्यातील धान्य घोटाळा प्रकरणी नांदेडचे 18″ भ्रष्ट पत्रकार” (?) इडीच्या रडारवर असल्याची बातमी “एबीपी माझानं” काल ठोकून दिली .. इडीच्या सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिल्याचा उल्लेख बातमीत आहे.. जे दोषी किंवा माझा च्या कल्पनेतील भ्रष्ट पत्रकार असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.. अशा प़वृत्तीची आम्ही कधीच पाठराखण करीत नाही..करणार नाही.. मात्र नांदेडचे 18 पत्रकार इडीच्या रडारवर अशी व्हेग बातमी एबीपी माझानं दिल्यानं नांदेड जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांकडे संशयानं पाहिलं जाऊ लागलं आहे.. त्यात प़ामाणिकपणे आणि निष्ठेनं पत्रकारिता करणारे पत्रकार देखील भरडले जात आहेत.. जे पत्रकार व़त समजून पत्रकारिता करतात अशा प़ामाणिक पत्रकारांच्या भोवती संशयाचे धुके निर्माण करण्याचा कोणताही अधिकार एबीपी माझाला नाही.. 18 भ्रष्ट पत्रकार कोण आहेत? त्यांची नावं एबीपी माझाकडे असतील तर त्यांनी ती जाहीर करावीत अन्यथा नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांची चॅनलनं माफी मागितली पाहिजे..अशी नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांची मागणी आहे..
बातमी नंतर नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये मोठीच संतापाची लाट उसळली.. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाने आज तातडीने बैठक घेऊन एबीपी च्या खोडसाळपणाबददल तीव्र नाराजी व्यक्त करून आपल्या संतप्त भावना संपादक राजीव खांडेकर यांच्या कानावर घालण्याचा निर्णय घेण्यात आला.. तसेच चॅनलच्या या खोडसाळपणाची तक़ार देखील माहिती आणि प़सारण मंत्रालय, तसेच कलेक्टर आणि संबंधित यंत्रणेकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला..
सनसनाटी निर्माण करण्यासाठी अनेकदा सूत्रांचा हवाला देऊन बातम्या दिल्या जातात.. या बातम्यांचे समाजमनावर तसेच संबंधित व्यक्ती किंवा घटकावर काय परिणाम होतात याची पर्वा केली जात नाही हे पत्रकारितेच्या धर्मात बसत नसल्याचे मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे..