पत्रकारांना टोल माफीची बातमी म्हणजे एप़िल फुलचा वाह्यातपणा*
“महाराष्ट्रातील पत्रकारांना महामार्गावर टोल माफी देण्याचा आणि अप़घात झाल्यास विमा कवच देण्याचा निर्णय श्री. नितीन गडकरी यांनी घेतल्याची बातमी गेली दोन दिवस सोशल मिडियावर फिरत आहे..त्यासंबंधी विचारणा करणारे अनेक फोन मला आले.. ती बातमी म्हणजे *एप़िल फुल*आहे.. बातमी खरी नाही..रस्ते विकास मंत्रालयाच्या वेबसाईटवर बातमीची सत्यता पाहिली.. असा कोणताही अध्यादेश काढण्यात आल्याचे दिसले नाही.. दुसरी गोष्ट अशी की, केंद्र सरकार एकट्या महाराष्ट्रासाठी असा निर्णय घेण्याचे कारण नाही.. सध्या महाराष्ट्रात निवडणुकाही नाहीत.. (मात्र आमच्या सरकारने पत्रकारांना टोल माफी दिली म्हणून काही भक्तांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली.. न केलेल्या कामाचं श्रेय घेण्याची सवय दुसरं काय) बातमीत सिंधुदुर्गच्या पत्रकारांचे शिष्टमंडळ दिल्लीत गेल्याचा उल्लेख आहे.. सिंधुदुर्गच्या पत्रकारांचे असे कोणतेही शिष्टमंडळ दिल्लीला गेले नाही किंवा नितीन गडकरी यांना भेटले नाही अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी दिली.. 1 एप़िल रोजी एका दैनिकाने ही बातमी एप़िल फुल म्हणून दिल्याचे जेठे यांनी सांगितले… त्यामुळे या बातमीवर कोणी विश्वास ठेऊ नये असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेने केले आहे..वर्तमानपत्रांची विश्वासार्हता अगोदरच धोक्यात आलेली आहे अशा स्थितीत वर्तमानपत्रांनी एप़िल फुल सारखा वाह्यातपणा करू नये असे माझे मत आहे.. कारण जे छापून येते ते खरे असते या कल्पनेवर आजही ज्यांचा विश्वास आहे त्यांचाही विश्वास संपुष्टात आणणारा हा वाह्यातपणा आहे.. माध्यमांचं काम सत्य बातमी देणं आहे.. मनोरंजन करणं नाही हे माध्यमांनी ध्यानात घ्यावं आणि आपली उरली सुरली विश्वासार्हता टिकवावी ही नम़ विनंती..पत्रकार चौकस असतात असं सारेच समजतात.. एवढे सहज आपण आपण “फुल” कसे काय बनू शकतो? कोणाला जराही शंका कशी नाही आली? कोणतीही बातमी अंधपणे Forward करताना त्याची खात्री करणे आवश्यक आहे.. यापुढे तरी आपण सारे हे लक्षात ठेवू…