मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम,खराब रस्ते आणि मोठी वर्दळ यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई-गोवा महामार्गाला असणाऱ्या पर्यायी मार्गांचा गणेश भक्तांनी वापर करावा असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाने केले आहे. रायगड जिल्हयातील हे पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
1) पळस्पे आणि खारपाडा टाळण्यासाठी मुंबई-वाशी-पामबीच-उरण फाटा-चिरनेर-खारपाडा-वडखळ-महाड हा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे.
2)पळस्पे-पेण- वडखळ टाळण्यासाठी मुंबई-खालापूर- पाली फाटा-जांभुळपाडा-वाकण-माणगाव-महाड
3) पळस्पे टाळण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून खालापूर टोलनाक्यावरून पेणहून पुढे वडखळ मार्गे कोकणात जाता येईल.
4) वडखळ ते नागोठणे कोंडी झाल्या- वडखळ-पेझारी-नागोठणे-माणगाव-महाड हा मार्ग वापरावा. पेण-भोगावती नदीवरील नवा पूल कार्यान्वित करण्याचा प्रयत्न
रत्नागिरी आणि पुढेही मुख्य रस्त्याला पर्यायी मार्ग सूचविण्यात आले आहेत.तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना रात्रीची वाहतूक बंदी कऱण्यात आली आहे.