मुंबई चला एडिटर्स गील्ड ऑफ इंडियाला जाग आली..घटना घडल्यानंतर आठ दिवसांनी का होईना,आणि चॅनलचा नामोल्लेख टाळून का होईना गील्डनं आज एक पत्रक काढून माध्यम स्वातंत्र्यातील सरकारच्या हस्तक्षेपाचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे.एबीपी न्यूजचे पत्रकार मिलिंद खांडेकर,पूण्य प्रसून वाजपेयी यांना राजीनामा द्यावा लागला होता.तत्पुर्वी चॅनलचं सिग्नल बंद करणे,भाजपच्या प्रवक्तयांनी चॅनलवर चर्चेला न जाणे,बाईट न देणे असे प्रकार घडले होते.तीन पत्रकारांचे राजीनामे या पार्श्वभूमीवर आले होते.तरीही दिल्लीतील पत्रकार संघटना गप्प होत्या.संघटनांच्या या बोटचेपेपणावर चौफेर टीका झाल्यानंतर आज एडिटर्स गील्डनं निषेधाचं पत्रक काढलं आहे.यामध्ये चॅनेलच्या नावाचा उल्लेख टाळला गेला आहे हे विशेष.
एडिटर्स गील्ड म्हणते ,’एका हिंदी वृत्तवाहिनीतील दोन वरिष्ठ पत्रकारांना तडकाफडकी द्यावे लागलेले राजीनामे आणि सरकारवर टीका करणार्या कार्यक्रमाच्या प्रसारणात वारंवार आणले गेलेले अडथळे या प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेत आहोत,माध्यम स्वातंत्र्यातील सरकारचा हा हस्तक्षेप निषेधार्ह आहे ‘
माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठी ज्या प्रवृत्ती काम करीत आङेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील गील्डनं केली आहे.,माध्यमाच्या मालकांनी सरकार किंवा कोणाच्याही दबावापुढे झुकू नये असा अनाहूत सल्लाही गील्डनं मालकांना दिला आहे.जो प्रकार घडला तो माध्यम स्वातंत्र्याच्या मुळावर आणि भारतीय लोकशाहीच्या एका स्तंभावर झालेला हल्ला आहे अशा भावना गील्डनं व्यक्त केल्या आहेत.
सरकारनं याबाबत खुलासा करण्याचं आवाहन केले आहे.जो प्रकार घडला त्यामागे सरकारचा हात नाही किंवा कोणत्याही एजन्सीच्या माध्यमातून सरकारनं ही कृती केलेली नाही याबाबत सरकारनं आश्वस्त केलं पाहिजे.मुक्त असलेल्या सॅटलाईट सिग्नलमध्ये अशा प्रकारे कुणीही ढवळाढवळ करू शकत नाही असेही एडिटर्स गील्डनं म्हटलं आहे.पूण्य प्रसून वाजपेयी यांनी आपणास कोणत्या परिस्थितीत राजीनामा द्यावा लागला यावर सविस्तर लेख लिहिला आहे.त्यानंतर गील्डचे पत्रक निघाले हे विशेष
अडथळे तर चंद्रकांतदादा पाटील यांच्या मुलाखतीत आले होते ते जेव्हा माझा कट्टावर आले होते चंद्रकांतदादांची मुलाखत नीट ऐकता आणि पहाता आली नव्हती आणिबाणीच्या काळात ही गिल्ड होती का?