1942च्या चलेजाव आंदोलनात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह कॉग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना अटक करून नगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले होेते.नेहरू जवळपास अडिच वर्षे या किल्ल्यात होते याच कालावधीत नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला.या किल्लयाला नुकतीच सहकुटुंब भेटदेण्याची संधी मिळाली.
नगर शहराच्या बाहेर पाथर्डी रस्त्यावर नगरचा हा ऐतिहासिक किल्ला आहे.किल्ल्यीची तटबंदी आजही सुस्थितीत असली तरी किल्लयाचा आतला परिसर जंगलसदृश्य आणि अस्ताव्यस्तच आहे. आहे.किल्ला सध्या भारतीय लष्कराच्या ताब्यात असला आणि लष्कराची काही कार्यालयं किल्लयातील इमारतीत असली तरी किल्लयाची जी व्यवस्था ठेवायला हवी ती ठेवली गेली नाही.नेहरू,आचार्य कृपलानी यांच्या साऱख्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना किल्लयातील ज्या ठिकाणी ठेवले गेले होते तो परिसर देखील घाणीने व्यापलेला आहे.सर्वत्र जंगली झाडं वाढलेली आहेत.हा सारा परिसर बेवारस आहे.किल्ल्यातील ही सारी दृश्य बघताना नक्कीच अस्वस्थ झालं.आपले किल्ले असतील किंवा ज्या ठिकाणांना ऐतिहासिक महत्व आहे अशा वास्तूंचे केवळ जतन कऱणं,तो परिसर स्वच्छ ठेवणं येणाऱ्या पर्यटकांना आणि अभ्यासकांना त्याची माहिती उपलब्ध करून देणं आवश्यक असलं तरी भारताच्या वैभवशाली इतिहासाकडं कोणाचं लक्ष नाही हेच दृश्य इतर ठिकाणाप्रमाणेच नगरच्या किल्ल्यातही दिसलं. लष्करानं हा परिसर किमान स्वच्छ ठेवला तरी पर्यटक नक्कीच हा किल्ला बघायला येतील असं वाटतं.
शोभना देशमुख