गुगलवर अचानक मला खालील छायाचित्र मिळाले.हे छायाचित्र 12 डिसेंबर 2012 रोजीचे आहे.पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने आम्ही हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता.तत्कालिन विरोधी पक्ष नेते आणि आजचे महसूल मंत्री एकनाथराव खडसे आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या मोर्चाला सामोरे आले आणि त्यांनी तेथे भाषणही केले.पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त करून त्यांनी राज्यात तातडीने पत्रकार संरक्षण कायदा लागू केला पाहिजे तसेच ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन सुरू केले पाहिजे अशी मागणी केली होती.त्यावर आम्ही टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला होता.मात्र हे नेते आज सत्तेवर येऊन जवळपास दीड वर्षे होत आहे.दीड वर्षात आम्ही अनेकदा यांच्या भेटी घेतल्या मात्र ना कायदा होतोय ना पेन्शनचा प्रश्न मार्गी लागतोय,कळत नाही आता विश्वास कोणावर ठेवायचा.?