पत्रकार दिनू रणदिवे यांच्या घरी
गृहमंत्री अनिल देशमुख..
मुंबई :गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील.. त्यांनी आज वेळात वेळ काढून एकाकी ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.. दिनू रणदिवे दादरच्या फुल मार्केटजवळ राहतात.. ते ९८ वर्षांचे आहेत तर त्यांच्या पत्नी 85 वर्षांच्या आहेत.. या वृध्द दाम्पत्याला मुळबाळ नाही.. ते ज्या चाळीत राहतात त्या चाळीत आजुबाजुला कोणीच राहात नाही.. ते डबा मागवून आपली उपजिविका करतात.. मात्र कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने दिनू रणदिवे यांच्या सारख्या वृद्धांची कशी स्थिती आहे हे समजून घेण्यासाठी अनिल देशमुख यांनी दिनू रणदिवे यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली.. आणि राज्यातील जनतेच्या वतीने आग्रहाने दिनू रणदिवे दाम्पत्याला काही जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या.. “दिनू रणदिवे यांच्यासारख्या पत्रकारांनी राज्यासाठी मोठं योगदान दिलेलं असल्यानं आपण सर्वांनीच त्यांची काळजी घेतली पाहिजे” अशा भावनाही अनिल देशमुख यांनी व्यक्त केल्या.. आपल्या शहरात, गावात अशा वयोवृद्ध व्यक्ती असतील तर स्थानिक पातळीवर त्यांना मदत केली पाहिजे असे आवाहनही अनिल देशमुख यांनी यावेळी केलं..
शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे पीआय केशव कासारांना यांना दिनू रणदिवे दाम्पत्याची काळजी घेण्याचे आदेशही अनिल देशमुख यांनी दिले आहेत..
मराठी पत्रकार परिषद अनिल देशमुख यांना विशेष धन्यवाद देत आहे.. एका वयोवृद्ध पत्रकाराची त्यांनी घरी जाऊन काळजी घेत मदतीची तयारी दर्शविली..दिनू रणदिवे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक पत्रकार म्हणून योगदान मोठे आहे.. मात्र नंतर त्यांची प़चंड उपेक्षा्षा झाली.. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहमंत्र्र्यांनी त्यांच्या घरी जाऊन भेटणंं विशेष महत्वाचं आहे..२०१७ मध्ये मराठी पत्रकार परिषदेने ९५ हजारांची थैली देऊन दिनू रणदिवे यांचा मा. उध्दव ठाकरे यांच्या हस्तेे ठाण्यत सत्कार केला होता..
महाराष्ट्र पोलीस पत्रकारांवर सूड उगवत त्यांच्यावर हल्ले करीत असताना गृहमंत्री एका ज्येष्ठ पत्रकाराच्या घरी जाऊन त्यांची आहे – नाहीच चौकशी करतात ही बाब नक्कीच दिलासा देणारी आहे.. अनिल देशमुख जी धन्यवाद..आपल्य वरिष्ठांपासून पोलिसांनी काही बोध घेतल्यास ही भेट लागल असं म्हणता येईल..
एस.एम.देशमुख