सातबारा व्हेंडिंग मशिन बसविणार 

0
1187

मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे दीर्घकाळ रेंगाळलेले सातबारा संगणकीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून आगामी काही दिवसातच रायगड जिल्हयातील शेतकर्‍यांना आपल्या जमिनीचा उतारा  एका क्लीकवर उपलब्ध होणार आहे.रायगड जिल्हयाच्या पंधरा तालुक्यातील सातबारा उतार्‍यांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे.त्यामुळं वेळ तर वाचणार आहेच त्याचबरोबर बेकायदेशीर फेरफार,गैरप्रकार आणि मानवी चुकांना आळा बसून भ्रष्टाचाराला देखील नियंत्रणात आणता येणार आहे असा विश्‍वास जिल्हा प्रशासनाला वाटतो.जिल्हयातील 11 लाख 35 हजार सातबारा उतार्‍यांचे डिजिटायझेशन पूर्ण कऱण्यात आले आहे.डिजीटायझेशन दरम्यान झालेल्या चुकांची दुरूस्ती करण्याचे काम आथा सुरू असून ते महिनाअखेर पूर्ण झाल्यानंतर शेतकर्‍यांना संगणीकृत सातबारे मिळणार आहेत.सातबारा उतारे घेताना इंटरनेट कनेक्टीव्हिटीचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हयासाठी स्वतंत्र सर्व्हरही उपलब्ध झाला आहे.या योजनेअंतर्गत सर्व तलाठी आणि मंडळ अधिकार्‍यांना लॅपटॉप देण्यात येणार असून त्यासाठी 2कोटी 46 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.जिल्हयातील पनवेल आणि उरण तालुक्यात एटीएम मशिन प्रमाणे सातबारा व्हेंडिंग मशिन बसविण्यात येणार असून जमिन मालकाने आपले नाव आणि जमिनीचा सर्व्हे नंबर मशिनमध्ये टाकल्यानंतर सातबारा उतारा कॉम्युटर स्क्रीनवर दिसेल.त्यानंतर एटीएम कार्डाव्दारे स्वाईप करून 20 रूपये शुल्क जमा केल्यास तात्काळ सातबाराची प्रिन्ट मिळणार आहे.संगणीकृत सातबार्‍यांमुळे शेतकर्‍यांची होणारी अडचण दूर होणार असल्याने ही योजना लवकर कार्यान्वित व्हावी अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.ः

 शोभना देशमुख अलिबाग -रायगड 

(Visited 178 time, 1 visit today)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here