उरण तालुक्यातील मोरा पोलिसांनी केलेल्या कारवाईत काही वेळापुर्वीच एक जीप पकडली असून त्यातून 99 हजार रूपयांची रोकड जप्त केली आहे.शेकापचे तालुका चिटणीस महादेव धरत हे ही रक्कम घेऊन उरणहून मोऱ्याकडे येत होते तेव्हा त्यांना पकडण्यात आले अशी माहिती मोरा पोलिसांनी आकाशवाणीला दिली.मतदारांना पैसे वाटण्यासाठी ही रक्कम आणली जात असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.मात्र महादेव घरत यांनी आपण ही रक्कम बॅकेतून काढून आणली आहे असे पोलिसांना सांगितले.मोरा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.