एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली
उद्या अलिबागेत पत्रकारांचा मोर्चा
अलिबाग – रायगड जिल्हयातील माणगाव येथील पत्रकार कमलाकर ओहाळ यांच्यावर काल झालेल्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या जिल्हयातील पत्रकारांनी आता रस्त्यावर उतऱण्याचा निर्णय़ घेतला आहे.या प्रकऱणातील आरोपीला कालच अटक झालेली असली तरी अशा तालिबानी प्रवृत्तीचा निषेध कऱण्यासाठी अलिबागमध्ये हातात काळे झेंडे घेऊन पत्रकार जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर जाणार आहेत.रेवदंडा नाक्यापासून मोर्चाला सुरूवात होईल.तो बस स्टॅन्डमार्गे जोगळेकर नाका,बालाजी नाका,स्टेट बॅकेकडून पोलीस प्रमुखांच्या कार्यालयावर जाईल.या मार्चात मी ,मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार,विभागीय चिठणीस मिलींद अष्टीवकर,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे रायगडचे निमंत्रक दीपक शिंदे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी,प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पवार,संतोष पेरणे यांच्यासह जिल्हयातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.जिल्हयातील आणि सभोवतालच्या जिल्हयातील पत्रकारांना देखील या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन कऱण्यात आले आहे.
यावेळी पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे अशी मागणी केली जाणार आहे.