विजय घोषित झाल्यानंतर साताराचे उदयनराजे भोसले यानी पत्रकारांना उद्देशून काटर्यानो अशी कोटी केली त्याची संतप्त प्रतिक्रिया आता माध्यमात उमटायला लागलीय.उदयनराजे यांना पत्रकारांनी हा तुमचा विजय आहे की,पक्षाचा असा प्रश्न विचारला होता.त्यावर काटर्यानो,तुम्ही असला घाणेरडा प्रश्न मला विचारणार हे माहितच होते असे उद्गगार त्यानी काढले.
तुम्ही वगळता अन्य उमेदवारांची डिपप्रझिट जप्त झाली हे पत्रकारांनी त्यांच्या लक्षात आणून दिले असता तुम्हाला काय वाटतं मी इथं सर्टिफिकेट ध्यायला आलोय काय मी इथं आलोय त्यांची डिपप्रझिट जप्त करायला या कधी तुम्ही पण…तुम्हालाही देईन थोडं..असं म्हणत त्यांन ी पत्रकारांकडं पाहून डोळे मिचकावले.या प्रकऱणाबद्दल अनेक पत्रकारांनी नाराजी करीत अशा अरेरावीचा प्रतिकार केला पाहिजे असे मत व्यक्त केले.