यंदाच्या पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात तब्बल २८ दिवस समुद्राला उधाण येणार असून या काळात अनेक वेळा साडेचार मीटर उंची पयॅंत च्या महाकाय लाटा समुद्रात उठणार आहेत. जूनमध्ये ३ते८ आणि १५ते१९ तारखांना उधाण येईल. जुलैमध्ये २ ते ७ आणि 3१ जुलै, ऑगस्टमध्ये १ ते ५ आणि २९ – 30 ऑगस्ट तसेच सप्टेंबरमध्ये १ते3 आणि 28 ते 29 या काळात समुद्राला मोठे उधाण येईल. उधाणाचया काळात पाऊस कोसळत असेल तर महापूरसथिती निमा॓ण होऊ शकते. याचा फटका समुद्र काठावरील गावं तसेच खाडी काठचया गावांना बसू शकतो. त्यामुळे या गावांना सतत सतकॅ राहावे लागेल. रायगड जिल्ह्यात समुद्राच्या काठावर ५३ गावं असून खाडीच्या काठावर ७२ गावं आहेत.. पावसाळ्यात या 125 गावांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार असणार आहे.

शोभना देशमुख
अलिबाग, रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here