राज्यातील छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांच्या मालक-संपादकांचा ऐतिहासिक राज्यव्यापी मेळावा हिंगोली जिल्हयातील औढा नागनाथ येथे 1 सप्टेंबर 2018 रोजी होत आहे.या मेळाव्यास जे पत्रकार 31च्या रात्री येतील त्यांची व्यवस्था कॉमन हॉलमध्ये करण्यात आली आहे.ज्यांना स्वतःची स्वतंत्र व्यवस्था हवी आहे अशा पत्रकारांनी स्वतःची व्यवस्था स्वखर्चानं लॉजमध्ये करता येईल .त्यासाठी आौढा येथील काही होॅटेलचे नंबर्स देत आहोत.
श्री कृपा मंगल कार्यालय ः 9422878675,
श्री सद्गगुरू निवास 9423466031,
यजमान निवास 9021478049,
पंकज जाधव 9890137575
31 तारखेला मुक्कामास येणार्यांनी 27 तारखेपर्यंत आपली नावं कळवावीत,ऐनवेळी अडचण होऊ नये यासाठी सहकार्य अपेक्षित आहे.
औढा नागनाथला येण्यासाठी परभणी येथून हिंगोलीकडे जाणार्या बसेस आहेत.परभणी हिंगोली हे अंतर 50 किलो मिटर आहे.नांदेडकडून येणार्यांनी वसमत मार्गे तर अकोल्याकडून येणार्यांनी वाशिम-हिंगोली मार्गे औरंगाबादकडून येणार्यांनी जिंतूर मार्गे यावे.जिंतूर हिंगोली मार्गावर औढा लागते.रेल्वेनं येणार्यांनी परभणी स्थानकावर उतरून पुढे बसनं औढा नागनाथ येथे यावे.
कार्यक्रम संपल्यानंतर ज्यांना नजिकच्या तीर्थक्षेत्रांवर दर्शनासाठी जायचे आहे त्यांच्यासाठी
संत नामदेवांचे जन्मस्थळ नर्सी नामदेव औढ्यापासून केवळ 30 किलो मिटर अंतरावर आहे.
औढ्यापासून माहूरच्या रेणुका देवीचे अंतर 125 किलो मिटर आहे,
नांदेडचा सुप्रसिध्द गुरूव्दारा 60 किलो मिटर अंतरावर आहे.
संपर्कासाठी मोबाईल नंबर
नंदकिशोर तोष्णीवालः 9422878374
विजय दगडू 9822181277
गजानन वाखरकर 9423939900
प्रभाकर स्वामी 8087128039
योगेश अग्रवाल 08605239337
कार्यक्रमाचे स्थळः औढा नागनाथ बस स्थानकासमोर भक्त निवास क्रमांक 2 येथे आहे.
कार्यक्रमाची वेळ ः सकाळी ठीक 10.30 वाजता
नोंदणी शुल्क ः मेळाव्यास उपस्थित राहणार्यांना नोंदणी शुल्क म्हणून 100 रूपये आकारले जातील याची सर्वांनी नोंद द्यावी.
आपला
नंदकिशोर तोष्णीवाल
अध्यक्ष
हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघ