आॅक्युर्ट आऊट

0
777

 ऑर्कुटवर अनेकांचं पहिलं प्रेम जुळलं, ज्या ऑर्कुटमुळे अनेकांना आयुष्यभर साथ देणारा जोडीदार भेटला, ज्या ऑर्कुटने दुरावलेल्या नात्यांचा पूल नव्याने बांधला ते ऑर्कुट सोशल मीडियातून कायमचे निरोप घेणार आहे. फेसबुक आणि ट्विटरच्या वाढत्या प्रभावामुळे सोशल मीडियाची पायाभरणी करणाऱ्या ऑर्कुटला वेबविश्वाच्या नकाशावरून परागंदा व्हावे लागणार आहे. येत्या ३० सप्टेंबरपासून ऑर्कुटचे शटडाऊन करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे.

यूट्युब, ब्लॉगर आणि गुगल प्लस या सेवांना मिळत असलेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन या सेवांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ऑर्कुट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गुगलचे इंजीनिअरिंग डायरेक्टर पॉल गॉल्हर यांनी स्पष्ट केले. या निर्णयानंतर ऑर्कुटने सोमवारपासूनच नवे युजर्स स्वीकारायचे बंद केले आहे.
२०१० मध्ये ऑर्कुट या साइटचे भारत आणि ब्राझील या देशांमध्ये सर्वाधिक युजर्स होते. ब्राझीलमधील नेटकर तर फेसबुकपेक्षाही ऑर्कुटच्या प्रेमात नेटकर होते. आजही ऑर्कुटच्या एकूण युजर्सपैकी भारतात २० तर ब्राझीलमध्ये ५० टक्के युजर्स आहेत. मात्र जगभरातील ऑर्कुटच्या युजर्सचे घटलेले ]प्रमाण ध्यानात घेऊन २०११ मध्ये गुगलने फेसबुकला टक्कर देण्यासाठी ‘गुगल प्लस’ सेवा सुरू केली आणि तेथूनच ऑर्कुटचा उलटा प्रवास सुरू झाल्याचे बोलले जात आहे. जानेवारी २००४ मध्ये वेबविश्वात पदार्पण करणाऱ्या या सोशल नेटवर्किंग साइटचे आयुष्यमान अवघे १० वर्षांचेच ठरले आहे.

२०१६ पर्यंत डेटा उपलब्ध राहणार
३० सप्टेंबरपासून ऑर्कुट बंद करण्यात येणार असले तरी त्याच्या सध्याच्या युजर्सचे नुकसान होऊ नये याची काळजी गुगलने घेतली आहे. साइट बंद झाल्यानंतरही पुढची दोन वर्षे म्हणजेच २०१६ पर्यंत युजर्स त्यांच्या प्रोफाइलमधील डेटा ट्रान्स्फर वा काढून घेऊ शकतात, असे गुगलने स्पष्ट केले आहे {.मटावरून साभार}

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here