आसामच्या कोक्राझार शहरात गुरूवारी रात्री प्रेस क्लबचे सचिव आणि जनसाधारण या दैनिकाचे प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार धऩंजय नाथ यांच्यावर चार बंदुकधारियांन ी हल्ला केला.आपले काम करून मोटार साईकलवरून घरी जात असताना त्यांना कोटियापाडा भागात अडवून बंदुकीच्या द्स्त्यानं त्यांच्यावर वार केले गेले.या प्रकाराने गंभीर जखमी झालेल्या नाथ यांना रूग्णालयात दाखल कऱण्यात आलंय.त्यंाची प्रकृती आता स्थिर आहे.या घटनेचा आसाममधील पत्रकारांनी निषेध केला असून हल्लेखोरांना तातडीनं अटक करावं अशी मागणी केली आहे.