पत्रकारितेमुळे लाभलेल्या लोकप्रियतेचा लाभ उठवत अनेक जण राजकारणात जातात..मात्र तेथे त्याचं मन रमतंच असं नाही.अल्पावधीत भ्रमनिराश होऊन राजकारणातून बाहेर पडलेल्यांची संख्या देशात कमी नाही.अण्णा हजारे यांनी जनआंदोलन उभं केलं तेव्हा अनेक पत्रकार त्यांच्याकडं आकर्षित झाले.नंतर अरविंद केजरीवाल यांनी राजकीय पथ निवडला.त्यांच्यासमेवेतही दिल्लीतले काही मान्वयर पत्रकार गेले.त्यांनी निवडणुकाही लढविल्या.मात्र जनतेनं त्यांना स्वीकारलं नाही.ते पराभूत झाले.राजकारणात येऊनही सत्तेचा स्पर्श होत नाही असं दिसल्यावर एक एक पत्रकार मग परतू लागला.दोन दिवसांपुर्वी आशुतोष यांनी आप सोडल्याची बातमी आली होती.आता दुसरे नेते आशीष खेतान यांनीही आपचा राजीनामा दिल्याची बातमी आहे.ते देखील पत्रकारितेतून राजकारणात आले.त्यांनीही व्यक्तिगत कारणांमुळं राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे.आपचे राजकारण आता व्यक्तिकेंद्री बनलंय.राजकारण्यांच्या ज्या दोषांवर पत्रकार बोट ठेवत आले त्या दोषांशीस जुळवून घेणं सदासर्वकाळ शक्य होत नाही.केव्हा तरी बांध तुटतो.आशुतोष आणि खेतान याचं असंच झालेलं असावं.