आम्ही… आमच्यासाठीचा.. नायगाव पॅटर्न
नायगाव हा नांदेड जिल्ह्यातील छोटा तालुका.. सर्वच वर्तमानपत्रांचे तेथे प़तिनिधीं.. संख्या ५०-६० तरी.. यातील बहुतेकजण मराठी पत्रकार परिषदेशी जोडले गेलेले आहेत.. कोरोना लाटेत दोन पत्रकार गेले.. त्यानंतर त्यांच्या कुटुंबासमोर ज्या आपत्ती उभ्या राहिल्या तशी वेळ इतरांवर येऊ नये अशी सर्व पत्रकारांची इच्छा असणं स्वाभाविक होतं.. वेळेला कोणीच मदतीला येत नाही याचा अनुभव पाठिशी होता.. मग सर्वजण एकत्र आले.. निर्णय झाला.. दरवर्षी प्रत्येक पत्रकाराने एक हजार रूपये काढायचे ते संस्थेकडे जमा करायचे..या रक्कमेतून कोणी पत्रकार अडचणीत आला तर त्याला मदत करायची.. थोडक्यात पत्रकारांनी आत्मनिर्भर व्हायचं.. कोणाकडे मदतीची याचना करायची नाही.. ही योजना केवळ कागदावर राहिली नाही.. अनेक पत्रकारांनी पैसे जमा केले आहेत.. इतर जमा करीत आहेत..
नायगाव सारख्या एका छोट्या गावातील पत्रकारांनी स्वीकारलेला हा आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वागतार्ह आणि अनुकरणीय आहे.. इतर तालुका आणि जिल्ह्यांनी हा मार्ग पत्करला तर सरकार आमच्यासाठी काही करीत नाही म्हणून गळे काढण्याची गरज पडणार नाही..आम्ही.. आमच्यासाठी ही योजना सर्वत्र राबविली गेली पाहिजे..
नायगावच्या सर्व पत्रकार मित्रांचे अभिनंदन..