पत्रकारांच्या तीन तीन पिढ्या परिषदेबरोबर..
आम्हाला अभिमान आहे…
मराठी पत्रकार परिषद ही संस्था गेली 79 वर्षे वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी,मराठी पत्रकारांच्या हक्कासाठी,त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. या काळात .आचार्य अत्रे,पा.वा.गाडगीळ,प्रभाकर पाध्ये,ह.रा.महाजनी,अनंतराव पाटील,रंगा अण्णा वैद्य यांच्यासह अऩेक महान तपस्वी पत्रकारांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले। परिषदेसाठी ही अभिमानाची तर गोष्ट आहेच त्याचबरोबर परिषदेला आणखी एका गोष्टीचासार्थ अभिमान आहे.महाराष्ट्रातील पत्रकारांची अनेक घराणी स्थापनेपासून परिषदेसोबत आहेत.पत्रकारांच्या अनेक संघटना स्थापन झाल्या,कालौघात त्या विसर्जितही झाल्या मात्र काही निष्ठावान घराणी तीन तीन पिढ्यांपासून फक्त आणि फक्त परिषदेबरोबरच आहेत.परिषदेवरील त्यांच्या निष्ठा आजही अविचल आहेत.त्यांच्या या निष्ठेला आमचा सलाम.
.करमाळा येथील चिवटे घराणे यापैकीच.चिवटे घराण्याच्या तीन पिढया परिषदेबरोबर आहेत.नरसिंह चिवटे यांचे वडिल मनोहरपंत चिवटे परिषदेचे सदस्य होते आणि आज त्यांची दोन्ही चिरंजीव महेश चिवटे आणि आयबीएन-लोकमतमध्ये कार्यरत असलेले मंगेश चिवटे परिषदेचे सदस्य आहेत.परिषद आणि सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची स्थापना झाल्यापासून चिवटे कुटुंब परिषदेबरोबर आहे.. अनेकांनी आपल्या निष्ठांचा बाजार मांडलेला असताना आणि सकाळी एकीकडं,दुपारी दुसरीकडं तर सायंकाळी भलतीकडंच अशी अनेकांची भ्रमंती असते.अशा वातावरणात मराठी पत्रकार परिषदेवर ७०-७० वर्षे ठाम विश्वास दाखविणार्या चिवटे यांच्यासारख्या सदस्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.त्यांच्या या निष्ठेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही प्रातिनिधीक स्वरूपात 78 वर्षांचे वयोवृद्ध पत्रकार नरसिंह चिवटे यांचा जाहीर सत्कार परिषदेच्या शेगाव अधिवेशनात करीत आहोत.निष्ठावान सदस्य हेच परिषदेचं बळ आहे आणि आम्ही अशा सदस्यांचा सन्मान करतो,त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
(मराठी पत्रकार परिषद् )