सुधागड तालुक्यातील दुधनी ठाकूरवाडी आणि ताडगाव आदिवासी वाडीतील रहिवाशांचे शोषण आणि त्यांच्यावर अन्याय केल्या प्रकरणी कॉग्रेसचे आमदार विजय सावंत आणि त्याच्या सहकार्यांना माणगाव सत्र न्यायालयाने काल 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.त्यांना 3 लाख 60 रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्यावर पाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता.आदिवासींना आपल्या जागेतून हुसकावून लावल्याचा त्यांच्यावर आरोप होता.हा आरोप सिध्द झाल्याने त्यांना माणगाव सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.-