30 एप्रिल रोजी मलकापूर नगरपालिकेवर नेण्यात आलेल्या तोडफोड मार्चाची बातमी देताना खबरे शामतक या दैनिकाने आमदार संचेती यांचे बंधू सुरेश संचेती यांचे नाव मनसे कार्यकर्त्यांच्या नंतर छापले होते.त्यामुळे चिडलेल्या सुरेश संचेती यांनी फोन करून पत्रकार विरसिंह राजपूत यांना जिवे मारण्याची धमकी दिली.या घटनेचा शहर आणि तालुका पत्रकार संघाने निषेध केला आहे.तसेच एक निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे.