आमदार तुपाशी,जनता उपाशी या मथळ्याखाली आज संध्याकाळी आठच्या बातमीपत्रात झी-24 तासनं माजी आमदार पेन्शन विषयावर एक चांगली स्टोरी दाखविली.माजी आमदारांना महाराष्ट्रात किती पगार आहे आणि अन्य राज्यात किती आहे याची तुलना,पगार कसा आणि किती पटीनं वाढला याची माहिती आणि माजी आमदार संघटनेचे अध्यक्ष सुधाकर गणगणे यांच्या बाईटसह माझाही बाईट दाखविला गेला.त्यामुळं प्रकऱण नेमकं काय आहे ते महाराष्ट्रातील जनतेला चांगलं उमगलं.झी-24 तासचे पुण्याचे ब्युरो चीफ अरूण मेहेत्रे यांना मनःपूर्वक धन्यवाद.एक महत्वाचा विषय त्यांनी चांगल्या पध्दतीनं जनतेसमोर मांडला.झी-24तासचेही आभार.