पत्रकाराची नोकरी घालविली

0
782

कधी पत्रकारांवर प्रत्यक्ष शारीरिक हल्ले करून,कधी धमक्या देऊन तर कधी पत्रकारांवर खंडणी मागितल्याचे किंवा विनयभंगाचे खोटे खटले दाखल करून पत्रकारांचा आवाज बंद कऱण्याचा सातत्यानं प्रयत्न होत असतो.पत्रकार ज्या वर्तमानपत्रात काम करतो त्या पत्राच्या व्यवस्थापनावर दबाव आणून किंवा व्यवस्थापनाला धमकावून पत्रकारांना आयुष्यातून उठविण्याच्या घटना महाराष्ट्रात अनेक घडलेल्या आहेत.अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे.स्थानिक आमदाराच्या विरोधात बातमी देणे हिंदुस्थानचे पत्रकार अनिल ओझा यांना महागात पडले आहे.औझा हे हिंदुस्थानमध्ये डुमराव येथे काम करीत होते.जदयूचे स्थानिक आमदार दाऊद अली यांना न आवडणारी बातमी त्यांनी दिली होती.दाऊद अली यांनी याची तक्रार थेट हिंदुस्थानच्या व्यवस्थापनाकडे केल.त्यानंतर लगेच व्यवस्थापनाने कारवाई करीत ओझा यांना बाय बाय केले.हिंदुस्थानच्या या निर्णयाचा डुमरावच्या पत्रकारांनी तर आवाज उठविलाच पण स्वागतार्ह गोष्ट अशी की,हिंदुस्थानच्या पत्रकारांनीही आपल्या सहकाऱ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात काम बंद आंदोलन केले.एका आमदाराच्या धमकीनंतर पत्रकाराला घरचा रसत दाखविणे हे लेखणीला कलंकित कऱण्यासारखे आहे असे मत पत्रकार व्यक्त करताना दिसतात.अशा घटना सर्वत्र घडत असताता याविरोधात पत्रकारांनी एकजूट होत आवाज उठविल्याशिवाय अन्य मार्ग नाह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here