नरूपणाच्या माध्यमातून उत्तम समाज घडविण्याचे काम कऱणारे ज्येष्ठ निरूपणकार दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना डी.वाय.पाटील विद्यापीठाच्यावतीनं सन्माननीय डी.लीट ही पदवी बहाल करण्यात येणार आहे.विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.विजय पाटील यांनी ही घोषणा आज केली.डीवायपाटील विद्यापीठाचा आठवा वार्षिक दीक्षांत समारंभ शुक्रवारी नेरूळ येथील विद्यापीठाच्या परिसरात होत आहे.या कार्यक ्रमात आप्पासाहेबांना डीलीट ही पदवी दिली जाणार आहे.कार्यक्रमास विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.डीवायपाटील उपस्थित राहणार आहेत.
आप्पासाहेबांना डॉक्टरेट जाहीर झाल्याची बातमी आल्यानंतर आज असंख्य दासांनी रेवदंडा येथे जाऊन आप्पासाहेबांचे अभिनंदन केले.