इंडिया टीव्हीवर रजत शर्मा यांनी आपकी अदालत कार्यक्रमात घेतलेली नरेंद्र मोदींची मुलाखत फिक्स होती असा आरोप करीत इंडिया टीव्हीचे संपादकीय संचालक कमर वहिद नकवी यानी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.
मोदीच्या मुलाखतीचा भाजपला अपेक्षित लाभ झाल्याची चर्चा सोशल मिडियात चालू असल्याने विरोधक आणखीनच संतापले आहेत.सत्ता आल्यावर मिडियाला तुरूंगात टाकण्याची धमकी देणारे अरविंद केजरीवाल आता म्हणत आहेत की,भाजप मिडियाला धमकावत आहे.