मराठी पत्रकार परिषद ,मुंबई
वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार
प्रवेशिका पाठविण्याचे तालुका संघांना आवाहन
महाराष्ट्रातील 300 ते 325 तालुके मराठी पत्रकार परिषदेशी जोडले गेलेले आहेत.हे सारे तालुका पत्रकार संघ म्हणजे परिषदेचा आत्मा आहेत.अगदी तळागाळात राहून निष्ठेनं पत्रकारिता आणि सामाजिक कार्य कऱणारी ही पत्रकार मंडळी परिषदेसाठी अभिमानाचा विषय आहे.त्यामुळं महाराष्ट्राच्या दुर्गम भागातून राहूनही पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या भागाच्या विकासात मोलाचं योगदान देणार्या तालुका पत्रकार संघाच्या कार्याची दखल घेतली पाहिजे या जाणिवेतून दोन वर्षीपासून आपले दिवंगत अध्यक्ष वसंतराव काणे यांच्या नावाने आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार योजना परिषदेने सुरू केलेली आहे.२०१६ च्या पुरस्कारांचे वितरण २०१७ मध्ये नागपूर येथे झाले आहे.2017च्या पुरस्कारांचे वितरण २०१८ मध्ये पाटण येथे झाले . आता २०१८ साठीच्या पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.3 डिसेंबर रोजी म्हणजे परिषदेच्या वर्धापन दिनी पुरस्कार वितरण केले जाईल त्यासाठी तालुका पत्रकार संघांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
या प्रवेशिका पाठविताना खालील अटी लागू राहतील
1) केवळ जिल्हा पत्रकार संघ आणि परिषदेशी संलग्न तालुका संघांनाच पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविता येतील.
2) प्रवेशिका तीन प्रतित परिषदेच्या मुंबईतील कार्यालयात रजिस्टर्ड पोस्टाने पाठवाव्यात
3) प्रत्येक महसुल विभागातून एका तालुका पत्रकार संघाला पुरस्कार देण्यात येईल.असे नऊ पुरस्कार दिले जातील.
4) आलेल्या प्रवेशिकेतून पुरस्कार योग्य प्रवेशिकेची निवड करताना साधारणतः खालील गोष्टी पाहिल्या जातील.
अ) तालुका पत्रकार संघाच्या निवडणुका नियमित होतात का ?
ब) तालुका पत्रकार संघांचे आर्थिक हिशोब व्यवस्थित ठेवले जातात का ?
क) तालुका पत्रकार संघाने वर्षभरात पत्रकारांच्या कल्याणासाठी राबविलेल्या विविध योजना?
ड) सामाजिक कार्यातील पत्रकार संघाचा सहभाग?
इ) परिषदेचे उपक्रम राबविले आहेत का ? परिषदेने केलेल्या आंदोलनात पत्रकार संघाचा सहभाग?
ई) पत्रकार संघांच्यावतीने वर्षभरात घेतले गेलेले कार्यक्रम
वरील सर्व उपक्रमाची माहिती,छायाचित्र आणि बातम्यांच्या कात्रणांसह परिषदेकडे उशिरात उशिरा 20 नोव्हेंबरपर्यंत पाठवावी.
तीन सदस्यांची एक समिती आलेल्या प्रवेशिकांचा विचार करून आपला अहवाल परिषदेकडे सादर करेल.परिषद विभागीय सचिव आणि संबंधित जिल्हयाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेईल.
याच कार्यक्रमात रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघाचाही पुरस्कार दिला जाईल.परिषदेशी संलग्न जिल्हा संघातून एका संघाची निवड परिषदेचे पदाधिकारी करतील.
तालुका पत्रकार संघाने आपल्या प्रवेशिका 19 सप्टेंबरपूर्वी खालील पत्यावर पाठवाव्यात
अध्यक्ष
मराठी पत्रकार परिषद,
9 हजारीमल सोमाणी मार्ग,
ुप्रशासकीय अधिकारी महाविद्यालय वसतीगृह आवार,
छत्रपती शिवाजी टर्मिनस
मुंबई ः 400001
फोनः 022-22076459
पाटण येथे भव्य आणि शानदार सोहळ्यात गेल्या वर्षीचे पुरस्कार वितऱण केले गेले होते.त्याच पध्दतीनं यंदाही पुरस्कार वितरण होणार आहे.तेव्हा राज्यातील परिषदेशी जोडल्या गेलेल्या तालुका संघांनी जास्तीत जास्त संख्येनं या स्पर्धेत सहभागी होऊन आपण ग्रामीण भागात करीत असलेल्या कार्याबद्दल जगाला अवगत करावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने कऱण्यात येत आहे.