आता लक्ष्य पत्रकारांचे कुटुंबीय,सांगलीत पत्रकाराच्या मुलावर हल्ला
पत्रकारांवर हल्ले होत होते,आता पत्रकारांच्या कुटुंबांवरही हल्ले होऊ लागल्याचे एक उदाहरण सांगली जिल्हयातील जत येथून समोर आलं आहे.जत येथील पुढारीचे प्रतिनिधी दिनराज वाघमारे यांच्या मुलावर दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात गुंडांनी प्राणघातक हल्ला केला आहे.ही घटना महसूल कॉलनीत येथे घडली.याचा सांगली जिल्हयातील पत्रकारांनी धिक्कार केला असून जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन आरोपींवर कारवाई कऱण्याची मागणी केली आहे.
पत्रकाराला पोलिसांनी दमदाटी केल्याची घटना सांगली जिल्हयातील आष्ठा येथे घडली.विरोधात बातम्या दिल्याच्या रागातून सकाळचे तानाजी टाकले आणि पुढारीचे आष्ठा प्रतिनिधी उत्तम कदम यांना आष्टा पोलीस ठाण्याचे निरिक्षक अशोक कदम यांनी दमदाटी करीत यांची चेहरेपट्टी घ्या,डायरीत नोंद करा असा दम दिला.या प्रकरणी देखील पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे,–