बिहार,राजस्थान,झारखंड ,मध्यप्रदेश आणि अन्य काही राज्यांच्या धर्तीवर आता उत्तरप्रदेशमधील अखिलेश यादव सरकारही राज्यातील पत्रकारांसाठी बारा लाखांचा विमा योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे.मेडिक्लेम आणि व्यक्तिगत अपघात विमा अशा दोन्ही प्रकारचे संरक्षण या विमा योजनेतून दिले जाणार आङे.
पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच अखिलेश यादव यांची भेट घेऊन पत्रकारांसाठी विमा योजना सुरू कऱण्याची मागणी केली.ती सरकारने लगेच मान्य केली आहे.राज्यातील पत्रकारांसाठी शासकीय रूग्णालयातही आता मोफत उपचार क ेले जाणार आहेत.त्या संबंधिची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.महाराष्ट सरकार असा निर्णय कधी घेणार असा प्रश्न विचारत असून उद्या होणाऱ्या आंदोलनातही त्यासंबंधीची मागणी केली आहे.