पेड न्यूज हा शब्द आता सर्वमुखी झालेला आहे.त्याचं कुणालं काही वाटतंही नाही.मात्र आता पत्रकारितेला बदनाम करून सोडण्याचा विडा उचललेल्या राजकारण्यांनी पुढची पायरी ओलांडली आहे.पेड संपादकीय असा नवा प्रकार आता सुूरू झाला आहे.मध्यप्रदेशमध्ये सरकारनंच पेड संपादकीय लिहून घेतल्याचा आरोप तेथील विरोधकांनी केला आहे.मध्यप्रदेशच्या शिवराज सिंह चौव्हाण सरकारला अकरा वर्षे झाली आहेत.त्याप्रित्यर्थ सरकार आपल्या कामाचा डांगोरा पिटत आहे.व्यापममुळं बदनाम झालेलं हे सरकार त्यातून सावरण्यासाठी राज्यातील मान्यवर पत्रकारांकडून आपल्या कार्यावर लेख लिहून घेऊ लागलं आहे.आरोप असा केला जात आहे की,पुरवण्यांबरोबर सरकारची आणि मुख्यमंत्र्ंयाची तारीफ करणारे अग्रलेख लिहून घेतले जात असून ते पेड आहेत असा आरोप होत आहे.अग्रलेख हा वृत्तपत्राचा आत्मा असतो.संबंधित वृत्तपत्राची एखाद्या विषयावरची भूमिका त्यातून मांडली जात असते.मात्र त्या जागी शिवराजसिंह यांच्या मोठेपणाचे गोडवे त्यातून गायले जात आहेत .मोठ्या पत्रांच्या मालकाना मॅनेज करून हे उद्योग सुरू असल्याचे सांगितले जात आहे.–