पत्रकाराच्या आईचे आणि मुलीचे अपहरण करून त्यांची हत्त्या करणारया आरोपीचा शोध घेऊन कडक कारवाई करा :एस. एम देशमुख
नागपूर :
नागपूर शहरातील ‘नागपूर टुडे’ या संकेतस्थळाचे पत्रकार रविकांत कांबळे यांची आई आणि चिमुकल्या मुलीचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या दोघीही शनिवार सायंकाळपासून बेपत्ता होत्या. ही घटना धक्कादायक असून यातील आरोपींचा शोध घेउन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
उषा सेवकदास कांबळे (५४) आणि राशी रविकांत कांबळे (१८ महिने) अशी या दोघींची नावे आहेत. दिघोरीतीली पवनपुत्रनगर येथे हे कुटुंब राहते. या दोघीही शनिवारी संध्याकाळी ५.३० पासून बेपत्ता होत्या. उषा या नातीला घेऊन काही खरेदी करण्याकरिता किराणा दुकानात गेल्या होत्या, अशी प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर त्या घरी परतल्याच नाहीत. रात्री उशीरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दोघींचा कसून शोध घेणे सुरु केले.
ध