नवी मुंबई(बातमीदार)
कल्याण -डोंबिवली महापालिकेने पत्रकारांसाठी पन्नास लाख रूपयांचा आपत्तकालिन निधीची तरतूद अर्थसंकल्पात केल्याची बातमी परिषदेच्यावतीने सर्वत्र फिरल्यानंतर त्याची दखल घेत आता नवी मुंबई महापालिकेने देखील एक कोटी रूपयांचा पत्रकार आपत्तकालीन निधी ठेवावा अशी मागणी नगरसेवक किशोर पाटक यांनी केल्याने ही योजना नवी मुंबईतही राबविली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.किशोर पाटकर यांच्या प्रयत्नांचे मराठी पत्रकार परिषदेने स्वागत केले असून त्यांचे आभारही व्यक्त केले आङेत.राज्यातील अन्य महापालिकेत आणि नगरपालिकेत बजेटपुर्वी परिषदेच्या स्थानिक शाखेतर्फे तशी निवेदने देण्यात येत आहेत..–
:नवी मुंबईच्या पत्रकारांसाठी १ कोटीच्या आपत्कालीन निधीसाठी तरतूद करण्याची मागणी नगरसेवक किशोर पाटकर यांनी सभागृहात केली.कल्याण डोंबिवली महापालिकेच्या २०१८ – १९ च्या अंदाज पत्रकात यंदा प्रथमच पत्रकार आपत्कालीन निधी म्हणून रुपये ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे .त्याचप्रकारे नवी मुंबई पालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांना नवी मुंबई पालिकेने आपत्कालीन निधी द्यावा त्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करावी अशी सूचना नगरसेवक किशोर पाटकर यांनी सन २०१८ – १९ च्या अर्थसंकल्पीय महासभेत केली आहे .
.मुंबई व ठाणे महापालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना वा त्यांच्या कुटुंबियांना या संकट काळात मदत करता यावी , म्हणून ५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे .
त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने सुद्धा यंदाच्या अंदाज पत्रकात ५० लाख रुपयांची विशेष तरतूद केलेली आहे .