पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या आवाहनानुसार आज आणखी 8 आमदारांचे पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार संरक्षण कायद्यास पाठिंबा देणारी पत्रं उपलब्ध झालीत.त्यामध्ये कोकणातील राजापूरचे आमदार राजन साळवी,देवळालीचे योगेश बबनराव घोलप,रिसोडचे अमित सुभाषराव झनक,तसेच परभणी जिल्हयातील आ,राहूल पाटील,आ.विजय भांबळे,आ.मधुसुदन केंद्रे,आ.मोहन फड,आ.बाबाजानी दुराणी यांचीही पत्रे मिळाली आहेत.आमच्या मागणीला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व आमदार महोदयांचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे मनःपूर्वक धन्यवाद.तसेच ज्या पत्रकार मित्रांनी ही पत्रे मिळविली आहेत,त्यांनाही धन्यवाद.इतर भागातील पत्रकार मित्रांना विनंती की,आपणही आपल्या भागातील आमदारांची पत्रे तातडीने पाठवावीत
.सर्व भागातील आणि सर्व पक्षांच्या आमदारांची प्रातिनिधीक तरी पत्रे मिळाली पाहिजेत,या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत ही पुनश्च विनंती -एस.एम,