रायगड जिल्हयाच्या पेण तालुक्यातील निगडे गावातील सामाजिक बहिष्काराचा आणखी एक प्रकार समोर आला असून या प्रकरणी पोलिसांनी पोलीस पाटलांसह अठरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
धार्मिक कार्यासाठी जमा केलेल्या वर्गणीचा हिशोब मागितला म्हणून जनार्दन शिमराम नाईक यांच्या कुटुंबाला गावकीनं आठ वर्षांपूर्वी वाळित टाकलं होतं.या कुटुंबाला सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होण्यास तर बंदी होतीच त्याच बरोबर या कुटुंबाशी कोणीही संबंध ठेऊ नयेत असाही फतवा काढण्यात आला होता.अनेक वर्षे अशा प्रकारे उपेक्षिताचे जीणे जगणाऱ्या नाईक कुटुंबाने अखेर अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या मदतीने वडखळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्यानुसार गुन्हा दाखळ क ऱण्यात आला आहे.अद्याप कोणासही अटक झालेली नाही.