अलिबाग- सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत अलिबाग तालुक्यातील थळ उंदेरपाडा येथील दिलेश चिटके यांना गावकीनं वाळीत टाकल्याची घटना समोर आली आहे.चिटके यांनी यासंदर्भात अलिबाग पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी गावकीच्या अठराजणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
दिलेश चिटके मासेमारी करतात.परंतू त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याने त्यांच्या मासेमारी बोटीवर काम करण्यास मजूरही मिळत नसल्यानं त्यांची मोठी कोंडी झाली होती. या त्रासाला कंटाळून त्यांनी आज अलिबाग पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
रायगड जिल्हयात सातत्यानं घडत असलेल्या सामाजिक बहिष्काराच्या प्रकरणात विविध उपाययोजना केल्यानंतरही खंड पडायला तयार नसल्याचेच ताज्या घटनेवरून समोर आले आहे.गेल्या चार वर्षात जिल्हयात पन्नासवर सामाजिक बहिष्काराच्या घटना समोर आल्या आहेत.